जिल्हा बंदीमुळे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला अडथळा | Sakal Media |
उमरगा( जि. उस्मानाबाद) : कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तूळजापूरला भवानी मातेच्या दर्शनासाठी निघालेल्या परराज्यातील भाविकांना जिल्हाबंदीच्या आदेशामुळे अडचणींना सामोरे जावे लागले. कोरोनाच्या पार्श्वभुमीमुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी संसर्ग रोखण्यासाठी घेतलेला निर्णय योग्य असला तरी पायी चालत निघालेल्या परराज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश भाविकांना याची माहिती नसल्याने तूळजापूरच्या मार्गावरील अडथळे वाढले आहेत. सोमवारी (ता.१८) सकाळपासुन जकेकूर - चौरस्ता येथे पोलिसांनी भाविकांना जिल्हाबंदीच्या आदेशाची माहिती देत थांबवून ठेवले होते. ( व्हिडीओ : अविनाश काळे, उमरगा)
#Osmanabad #Tuljabhavanimata #kojagiripurnima #Districtban